एकच तारा आकाशात
विचार आला बघता बघता
आकाशिच्या तार्यांना
आपणही तारा व्हाव
वरुण बघाव सार्यांना ।
लुकलुकनार्या तार्यासारख
आपणही लुकलुकाव - चमकाव
दिवसभर शांत रहाव
रात्रभर जगुन घ्याव
सोबत म्हणुन हाक द्यावी
स्वप्नामधल्या परयांना
आपणही तारा व्हाव
वरुण बघाव सार्यांना ।॥
आकाशाच्या अंगणात
चांदण्यान्बरोबर खेळावा लपंडाव
खेळता खेळता शोधत रहावा
स्वप्नात हरवलेला गाव
येण्याची आपल्या लागावी चाहुल
सलासलानार्या वारयान्ना
आपणही तारा व्हाव
वरुण बघाव सार्यांना ।॥
चंद्राचा हात धरून सार्या
आसमंतात फिरून याव
तळपत्या सुर्यालाही
आपल कुतूहल वाटाव
पहाटे चांदण्या विझल्यावरहि
आपण मिरावाव दिमाखात
कौतुकान बघावा सार्यांनी
तो एकच तारा आकाशात ____ !!!!