माईल स्टोन्स

श्री

मन माझे
माईल स्टोन्स

' प्रश्न ' बस शब्द ऐकला तरी , मनाला कससच होत॰ पण जेंव्हा या शब्दाला मूर्तरूप येत तेंव्हा ते त्याच्या उच्चारापेक्षा कठीण आणि भयानक वाटायला लागत॰ तय शब्दाचा आभास जेवढा वैताग आणणारा आहे , त्याहिपेक्षा घबरावुन सोडणार त्याच अस्तित्व आहे॰
अर्थ काय त्या शब्दाचा ? या चिन्हाचा ? परत प्रश्नच ! त्या शब्दाचा अर्थ आहे आयुष्य , त्या चिन्हाचा अर्थ आहे - जीवन ।
हो ! खरच , नाहीतर आपण जगतो कशासाठी ? आणि जगतो म्हणजे नेमक करतो तरी काय ? आजकाल हाय वे या सुपर फास्ट म्हटल्या जाणारया रस्त्यांच्या कडेला 'माईल स्टोन्स ' किंवा मैलाचे दगड लावलेले असतात । कशासाठी - तर आपण किती अन्तर चाललो आणि अजुन किती अन्तर बाकी आहे म्हणजे कळाव म्हणुन।
हे प्रश्नाचिन्ह म्हणजे आपल्या आयुष्याच्या वाटेवरचे मैलाचे दगड आहेत। पण हां रस्ता मात्र हाय वे नाही। आणि या मैलाच्या दगडांवर अन्तर लिहिलेल नाही। एक क्लू , एक कोड आहे। सोडवायच आणि पुढे जायाच। ज्याच कोड सुटल त्याला हाय वे आणि जो अड़ला त्याला मात्र काटेरी वाट। आणि म्हणूनच या प्रश्नांना खुप महत्व आहे । नाहीतर उगाच जीवन कण्हण्यात काय अर्थ आहे।
अभिजीत !!!


माझे गाणे
click on the title



============================================